आणीबाणी 2.0!! दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपची पोस्टरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली.अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून कलगीतुरा चांगलाच रंगला असताना भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर ‘आणीबाणी 2.0’ असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.

https://twitter.com/AdvAshutoshDube/status/1324259003271012352?s=19

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी याआधीही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलरसारखे वागत असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं होतं. ‘महाराष्ट्रात आणीबाणीसारखी स्थिती असून उद्धव ठाकरे हिटलरसारखे वागत आहेत. शक्य तितक्या लवकर हे सरकार बरखास्त करण्यात यावं,’ असं बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. रायगडच्या अलिबाग येथे इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती, या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कलम ३०६ च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असल्याची माहिती आहे. गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment