बाळासाहेबांची शिवसेना विकणाऱ्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये – भाजप नेत्याचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने देशभरातुन अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्व विकली आहे. बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केलाय.

भाजपचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकणार हा निश्चय केला आहे. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी जे लोकं आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आजची भेट ही केवळ वैयक्तीक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतली,” असं प्रसाद लाड म्हणाले

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like