करोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या, भाजप नेत्याचा अजब सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. अनेक मोठे शास्त्रज्ञ कोरोनावर वॅक्सीन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष यांनी एक अजब सल्ला दिला आहे. गोमूत्राचे महत्व सांगत असताना दिलीप घोष यांनी लोकांना करोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ‘गोमूत्र पिल्यानं शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते’ असंही दिलीप घोष यांनी म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

‘मी जर गाईबद्दल बोलायला लागलो तर अनेक जण असहज होतील. गाढवं कधीही गाईची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. इथं आपण गाईची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणं आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गाईचं महत्त्व कसं काय लक्षात येईल’ असे विधान घोष यांनी केले आहे.

दरम्यान, दिलीप घोष हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतात. याअगोदरही ते अशी वक्तव्य करून चर्चेत आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिलीप घोष यांनी ‘गाईच्या दुधात सोनं असतं’ असं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोलही झाले होते. त्या अगोदर ‘गोमूत्र पिण्यात कोणतीही अडचण नाही. मी स्वत: गोमूत्राचं सेवन करतो’ असंही त्यांनी म्हटलं होतं.

Leave a Comment