भाजप नेत्याच्या मुलीवर बलात्कार करून डोळे फोडले आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडच्या पलामूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये भाजप नेत्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या मुलीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. या मुलीचे वय 16 वर्ष होते. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिचे डोळे फोडण्यात आले होते. मुलीचा मृतदेह पाहून पोलीसदेखील हादरले आहेत. मुलीने आत्महत्या केली असे दर्शवण्यासाठी तिला झाडाला टांगण्यात आले होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हि मुलगी पनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधबार गावामध्ये राहत होती. ही मुलगी 10वी त शिकत होती. 7 जूनपासून ती बेपत्ता झाली होती. मुलगी घरी परत न आल्याने तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता त्यांना लालमाटी जंगलात मुलीचा मृतदेह आढळला. यानंतर बुधवारी या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पीडित मुलगी हि भाजपच्या स्थानिक नेत्याची मुलगी होती. पोलिसांना घटनास्थळी एक मोबाईल सापडला आहे. या मोबाईलच्या मदतीने पोलिसांनी प्रदीप कुमार सिंह धनूक या व्यक्तीला अटक केली आहे. हा आरोपी विवाहित असून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मुलीवर बलात्कार केला असावा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिला बेदम मारहाण करून तिचा डावा डोळा खोबणीतून उचकटून बाहेर काढण्यात आला होता. यानंतर तिचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला.

You might also like