व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सुरेश कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची हजेरी?? चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे एकेकाळचे काँग्रेसचे वजनदार नेते सुरेश कलमाडी यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारण म्हणजे कलमाडींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे फेस्टिव्हल सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन शुक्रवारी होणार असून चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार आणि अभिनेते यावेळी उपस्थित असणार आहेत . भाजप नेत्यांच्या उपस्थितीने चर्चाना खऱ्या अर्थाने उधाण आलं आहे. भाजपचे दिग्गज नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कलमाडी आणि भाजपची जवळीक वाढली आहे का ? असा प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे भाजपनेच कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून कारवाईची मागणी केली होती.

२०११ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळाप्रकरणामुळे कलमाडी यांच्या राजकारणाला घरघर लागली. काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. मात्र, अजूनही पक्ष त्यांच्यापासून लांबच आहे असं म्हणावं लागेल. कलमाडी यांचे अद्यापही राजकीय पुनर्वसन काँग्रेसकडून करण्यात आलं नाही. त्यातच आता पुणे महापालिका तोंडावर असताना कलमाडी यांच्यातील जवळीकिने चर्चाना उधाण आलं आहे.