ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकींचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजबांधवांना आरक्षण द्यावे अशी मागणी केली. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या असल्याने आगोदर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवावा नंतर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी होत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला आहे. “पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसींना आरक्षण मिळू नये, असा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे,” असे पाटील यांनी आरोपात म्हंटले आहे.

भाजपकडूनअनेक आरोप करीत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. काल भाजपच्या प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. यावेळी पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमावले आहे. असे असूनही या सरकारमधील मंत्री खोटे बोलत आहेत.

या समाजातील लोकांना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबवणे म्हणजे त्यावेळी मोठ्या संख्येने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहील, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न दिसतो.

भाजपच्यावतीने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी अनेक ठिकाणी कार्यकारिणीच्या बैठकी घेण्यात आल्या. ओबीसी समाजाचे प्रश्न केवळ भाजपाच सोडवू शकते, याची जाणीव ओबीसी समाज बांधवाना आता झालेली असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment