व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सत्ता आल्यास बिहारमधील जनतेला मोफत कोरोना लस देऊ ; निवडणूक जाहीरनाम्यात भाजपचे आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपच्या या जाहीरनाम्यात 19 लाख रोजगारांची निर्मिती, क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापन अशा घोषणांचा उल्लेख आहे. लोकांनी आपले मत देऊन एनडीए सरकारला विजयी करावे. पुढील पाच वर्षांसाठी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या नेतृत्त्वाखाली बिहार एक प्रगत आणि विकसित राज्य म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वासही निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.

काय आहे भाजपाचा जाहीरनामा

१) करोनाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार
२) मेडिकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार
३) ३ लाख शिक्षकांची भरती करणार
४) बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार
५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार
६) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार
७) दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची उभारणी
८) धान्य आणि गहूसोबत सरकार डाळीही विकत घेणार
९) २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार
१०) गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात राज्य पहिल्या क्रमांकावर आणणार
११) दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’