औरंगाबाद | काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप अल्पसंख्याक सेलच्या शहरजिल्हा अध्यक्षच्या घरावर हल्ला चढवीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चिकलठाणा परिसरात समोर आला आहे.या प्रकरणी सात ते आठ जाणा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौलत खान बाबू खान पठाण वय-57 (रा.चिकलठाणा) असे मारहाणीत जखमी झालेल्या भाजप पदाधिकारीचे नाव आहे.
जखमी पठाण यांनी केलेले आरोप व पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, पठाण हे भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतात. मात्र त्यांचं भाजप मध्ये काम करणं काही काँग्रेस कार्यकर्त्यांना आवडत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता.
त्या नंतर गुरुवारी रात्री सात ते आठ आरोपीनी पठाण यांच्या घरावर हल्ला केला.यावेळी दगडफेक देखील करण्यात आली.या मारहाणीत पठाण जखमी झाले तर त्यांची चारचाकीचे देखील नुकसान झाले. जखमी पठाण यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शुक्रवारी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पठाण यांचे जबाब नोंदविले. त्या नंतर सात ते आठ आरोपी विरोधात एम.आय.डी. सी.सिडको पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे करीत आहेत.