ओबीसींच्या जातीनुसार जणगणनेसाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार- गोपीचंद पडळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या जातीनुसार जनगणना व्हावी यासाठी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) आक्रमक पावित्रा घेतला आहे. ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना व्हावी, यासाठी उद्या पंतप्रधान मोदींना पत्र देऊ, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. ओबीसींच्या जातीनुसार जणगणनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, अशीही माहिती पडळकरांनी दिली.

“सरकारमधील मंत्र्यांनी गेल्या काही दिवसांत जे काही वक्तव्य केलीय, ते बघितल्यावर मराठा आणि ओबीसीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं चित्र दिसतंय. त्याचबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी या सरकारने एकही बैठक घेतलेली नाही”, अशी टीकादेखील गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला. सरकार सारथी संस्थेला त्वरीत निधी देतं, मग महाज्योतीला निधी देताना राजकारण का?”, असा सवाल त्यांनी केला.“महाज्योतीला 500 कोटी रुपयांचा निधी द्या. ओबीसी मंत्री 500 कोटी रुपये महाज्योतीला मिळवून देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

त्याचबरोबर महाज्योतीला निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काहीही बोलत नाहीत, असंदेखील पडळकर यावेळी म्हणाले. महाज्योती संस्थेला फडणवीस सरकारने 320 कोटी रुपये दिले होते. पण सध्याच्या राज्य सरकारकडून महाज्योती संस्थेकडे दुर्लक्ष केलं जातंय. या सरकारने जाणीवपूर्वक महाज्योतीला निधी दिला नाही. ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे”, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment