आमदार राम सातपुतेंनी दाखवली तत्परता ; अपघातग्रस्त व्यक्तीला दिला मदतीचा हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माशिरसचे आमदार राम सातपुते यांनी मरणाशी झुंज देणाऱ्या एका अपघातग्रस्ताला मदत केली. त्यांच्या या मदतीचं कौतूक होत आहे. रात्रीच्या वेळी त्यांनी स्वत: संबंधित अपघातग्रस्त व्यक्तीच्या छातीवर पंपिग करत त्याला मदत केली.

रात्रीची वेळ होती. आमदार राम सातपुते मुंबई वरून मतदारसंघात जात असताना वाल्हे – नीरा दरम्यान पिसूरडी गेट जवळ त्यांना रस्त्यावर एके ठिकाणी गर्दी झालेली दिसली. त्या ठिकाणी त्यांना रस्त्यात एक अपघात झाल्याचे समजले. अपघातग्रस्त कोण आहेत, कुठले आहेत, कोणी अपघात केला याबद्दल काहीच कल्पना नव्हती, मात्र तातडीने ते गाडी थांबवत अपघात झालेल्या व्यक्तीजवळ पोहचले.

मरणाशी झुंज देणाऱ्या त्या व्यक्तीच्या छातीवर त्यांनी पंपिंग करायला सुरुवात केली, दरम्यान रुग्णवाहिकेला फोन करून सगळी माहिती दिली. जोवर रुग्णवाहिका येत नाही तोवर आमदार रामभाऊ स्वतः त्या अपघातग्रस्तांच्या छातीवर पंपिंग करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मदत करत होते. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना उचलून रुग्णवाहिकेत झोपवले अन आवश्यक त्या सूचना देऊन पुढे मार्गस्थ झाले समाजसेवा, मानवता, संवेदनशीलता ज्यांच्या रक्तात भिनलेली आहे ,असे लोकप्रतिनिधी आमदार रामभाऊ हे आपल्या कृतीतून च संदेश देतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment