ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक; राज्यभर भाजपचे चक्काजाम आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून आज अर्थात 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक अशाविविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले आहेत.

भाजपचे दिग्गज नेते यावेळी रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूर येथे चंद्रकांत पाटील, सांगलीत गोपीचंद पडळकर, तर अहमदनगर येथे राम शिंदे, सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन सुरू आहे. मुंबई येथे आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, आमदार पराग शाह, भालचंद्र शिरसाट यांच्या नैतृत्वात चक्काजाम आंदोलन होत असून मुलुंड इथे हजारोच्या संख्येनं भाजप कार्यकर्त रस्त्यावर उतरले आहेत.

दुसरीकडे मंत्रालय परिसरात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चात भाजपचे नेते गिरीष महाजन सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजामध्ये आज प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये कोणतीही एकवाक्यता नसल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालंय, असं गिरीष महाजन म्हणाले.

राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला अडल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे

Leave a Comment