आसूड ओढत साताऱ्यात उदयनराजेंचा ‘स्वाभिमानी’ला पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सध्या सातारा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक सुरु आहेत. सातारा बाजार समितीचीही निवडणूक सुरु असून या निवडणुकीत उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आज भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला. यावेळी जलमंदिर येथे उदयनराजेंनी आसूड ओढत विरोधकांना थेट इशाराच दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आता प्रत्यक्षपणे सहभाग घेतला आहे. त्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दर्शवला आहे. आज जलमंदिर येथे सर्व संघटनेच्या सातारा बाजार समितीच्या उमेदवारांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी एका शेतकऱ्याने आणलेल्या आसूड स्वतः हातात घेऊन ओढला.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे पत्रपट परिषद घेत माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निशाणाही साधला.