राज ठाकरेंचा अयोध्या दौरा यशस्वी होवो ; नारायण राणेंनी दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जय श्रीरामचा नारा देत अयोध्या दौरा करण्याची घोषणा दिली आहे. येत्या 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहीती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. याबाबत भाजप नेते नारायण राणे यांना विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी होवो हीच शुभेच्छा. एखाद्या नेत्याला वाटलं जावं, दर्शन करावं तर यावर काय बोलणार? पण शुभेच्छा दौरा यशस्वी होवू दे, अशी टिप्पणी नारायण राणे यांनी केली. शनिवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

दरम्यान, नारायण राणे यांना केंद्रातील मंत्रिपदाविषयी विचारल असता मला याबाबत काही माहिती नाही. पण तुमच्या तोंडात साखर पडो, असे नारायण राणे यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like