राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं? ; कृषी कायद्यावरून नारायण राणेंचा काँग्रेसवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात पण त्यांना शेतीमधलं काय कळतं? असा जळजळीत सवाल करत भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर प्रहार केला. तसेच मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत . या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? ही राजकीय आंदोलनं आहेत. यात समेट होईल असं मला वाटत नाही. असे नारायण राणे यांनी म्हंटल आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथ भाजप कडून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले,  पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर, दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवलं पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणलं आहे.

७० वर्षांमध्ये काँग्रेसला जे जमलं नाही. शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाहीत. तेच आज विरोध करत आहेत, आंदोलन करत आहेत. कोण आहेत विरोधक? स्वतः करू शकले नाहीत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधनं, कायदे होते. माल कुठं विकायचा? कसा विकायचा? कोणा मार्फत विकायचा? का दलाल मार्फत विकायचा मग कष्टाचे पैसै मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. ही गेली ७० वर्षांमधील कायदे व नियम पंतप्रधान मोदींनी मोडीत काढले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला याचं शेतकऱ्यांना समाधान मिळालं पाहिजे. म्हणून असा कायदा पंतप्रधान मोदींनी आणला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like