संजय राऊतांनी दादागिरीची भाषा करू नये, अन्यथा …; राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिरावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घमासान रंगल होत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा देत आत्ता फक्त महाप्रसाद भेटला आहे नंतर शिवभोजन थाळी मिळेल अस म्हंटल होत. दरम्यान राऊतांच्या या विधानाचा भाजप नेते नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेत संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही असें नारायण राणे यांनी म्हंटल. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे देऊन सेनाभवन बांधलं अस म्हणत शिवसेना वाढीसाठी राऊत यांचं काय योगदान? असा सवाल नारायण राणे यांनी केलं. यावेळी त्यांनीं उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली असून हिंदुत्वावर बोलण्याचा शिवसेनेला अधिकार नाही असेही राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी दादागिरीची भाषा करु नये. प्रसाद वाटत असाल, तर प्रसादाची परतफेड कशी द्यायची हे आम्ही शिकलो आहेत. शिवसेनेत असतानाच हे शिकलो आहे असे नारायण राणे म्हणाले. स्वत:ला सांभाळा अन्यथा तुमच्या वाट्याला शिवथाळी कधी येईल ते समजणार नाही. आजची शिवसेना माननीय बाळासाहेबांची शिवसेना नाही. ही आदित्य, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे” असे नारायण राणे म्हणाले.

You might also like