ज्यांना कधी 10 खासदार निवडून आणता आले नाही ते…; राणेंचा पवारांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपलब्ध पर्याय देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहकार्याची भूमिका घेईल अस म्हणत शरद पवार यांनी भाजपविरोधात मोहीम सुरू केली असून पवारांच्या या आव्हानानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. पवार साहेबांचं नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही,अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

ज्यांना कधी १० खासदार निवडून आणता आले नाही ते ३०० खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला आव्हान देणार? पवार साहेबांचं नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही, पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राकडे आहेत त्या पैकी १ प्रश्न मार्गी लावलेला दाखवा? अशी टीका निलेश राणे यांनी केली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले-

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधातील लढय़ाचे नेतृत्व कोणी करावे  हा मुद्दा नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करावे की आणखी कोणी हा विषयच नाही. पण, एक पर्याय देणे आवश्यक आहे. लोकांची तशी इच्छा आहे आणि पर्याय उभा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य राहणार आहे असे पवारांनी म्हंटल.