भाजपच्या पराभवानंतर निलेश राणेंचा जळफळाट ; महाविकास आघाडीवर टीका करताना ‘शिवीगाळ’चा केला वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. पुणे आणि नागपूर हे हक्काच्या मतदारसंघात देखील भाजपला पराभव पहावा लागला आहे. महाविकास आघाडीच्या या विजयामुळे आता पुन्हा एकदा राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. याच वादात आता भाजपाचे नेते निलेश राणेंनीही उडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी फार उड्या मारण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया निलेश यांनी दिली आहे. मात्र ही प्रतिक्रिया देताना त्यांनी अपशब्दाचा वापर केल्याचं ट्विटरवर दिसून येत आहे.

तीन पक्ष एकत्र येऊन दोन तीन सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखादी दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय जास्त वेळ टिकत नाही. तीन पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे. मात्र ही टीका करताना निलेश राणेंनी या पक्षांसाठी अपशब्द वापरला आहे.

तर दुसरीकडे भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “ठीक आहे आम्ही कमी पडलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा…मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..बाकी मैदानात परत भेटूच”, असं म्हणत नितेश राणे यांनी निशाणा साधला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment