मुख्यमंत्र्यांनी कधीही ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख आपल्या भाषणात करु नये – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप याच मुद्द्यावरून आक्रमक झालं असून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली.

ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे.पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like