Monday, January 30, 2023

ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही – राणेंचा अजितदादांवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वादात आता निलेश राणे यांनी उडी घेतली असून अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अजित पवार, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही अशा शब्दांत निलेश राणेंनी अजित दादांवर हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पहा. पवार साहेब ते तुमच्याकडे नाही ही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी आमदार सोडा नारळ पाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, विचार करून बोललं पाहिजे. अस ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -

अजित पवार काय म्हणाले होते-

भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती असा टोला अजित पवारांनी चंद्रकांत दादांना लगावला होता.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.