Monday, January 30, 2023

पवार साहेबांनी नाना पटोलेंना पान टपरी वालाचं करून टाकला; राणेंचा जोरदार टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर कशाला बोलू? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोले यांना फटकरल्या नंतर आता याच मुद्द्यावरून भाजप आमदार निलेश राणे यांनी नाना पटोले यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. पवार साहेबांनी नाना पटोलेंना पान टपरी वालाचं करून टाकला असा टोला निलेश राणे यांनी केला.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की… अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला.

- Advertisement -

शरद पवार नेमकं काय म्हणाले-

महाविकास आघाडीत आमच्या पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना पवारांनी म्हंटल की या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले.