रोहित पवारांनी नकलीपणा केला; पुरावा दाखवत निलेश राणेंनी केला हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभर गदारोळ माजला असताना इथे राज्यात निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यात कमी पडतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावर आता निलेश राणेंनी ट्विट करुन रोहित पवारांवर पलटवार केला आहे.

नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत”, असं म्हणत रोहित पवार यांच्या बारामती अ‌ॅग्रोचा फ्लेक्स निलेश राणे यांनी ट्विट केलाय.

रोहित पवारांच्या बारामती अ‌ॅग्रोच्या फ्लेसमध्ये काय म्हटलंय…?

करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे
वर्षभर हमी भावाने खरेदी
शेतकऱ्याला क्रेडिटवर बेबीकॉर्न बियाणे आणि मिरचीच्या रोपांची पुरवठा
शून्य टक्के वाहतूक
विविध पिकांसाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन अस त्या बॅनर वर लिहिलं असून त्याचाच आधार घेत निलेश राणे यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like