ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे – निलेश राणेंची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावरूनच विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च या बातमीचा संदर्भ निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे शासकीय बंगल्यात राहत सुद्धा नाही तरीदेखील त्यांच्या बंगल्यावर करोडोचा खर्च कशासाठी?? शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण बंगले चकाचक करायला आणि नवीन गाड्या घ्यायला ह्या सरकारकडे पैसे आहेत. ह्या ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे, असं राणे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या मुद्द्याकडे आज लक्ष वेधले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च या बंगल्यांवर करण्यात आला आहे. जलसंपदा विभाग, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. आरोग्य विभागावर जी तरतूद आहे. त्यात 50 टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment