..तर ‘शक्ती कायदा’ चाटायचाय का?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नितेश राणे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. तसेच आता पुन्हा एकदा भाजप कडून राज्यातील ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता। भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

नितेश राणेंनी ट्विटमध्ये शक्ती कायद्याचा उल्लेख करत महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर घणाघाती टीका केलीय. जे दिशा बरोबर झाले. तेच पूजा बरोबर होणार असेल. तर तो “शक्ती” कायदा, काय चाटायचा आम्ही?, असं म्हणत नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केलाय.

नक्की काय आहे प्रकरण –

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like