Wednesday, March 29, 2023

मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच केलं असतं तर चाललं असता का? ; राणेंचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली असताना आता भाजप आमदार भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला

औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस वर देखील टीका केली आहे. कृषी विधेयकाला विरोध कुठे आणि काशासाठो होतोय हे महत्त्वाचं आहे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकणातील शेतकरी कृषी कायद्याचं स्वागत करत आहेत. असेही नितेश राणे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’