हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत , गांज्यावर इतके प्रेम बर नाही अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.
मालकाचा घरीच “गांजाचा बादशाह” असल्या मुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते.. गांज्यावर इतके प्रेम बर नाही.. संजय राऊत अस ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
मालकाचा घरीच "गांजाचा बादशाह" असल्या मुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते..
गांज्यावर इतके प्रेम बर नाही..@rautsanjay61— nitesh rane (@NiteshNRane) October 18, 2021
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-
एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात” असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे,एनसीबीने या सगळ्याचा तपास करायला हवा. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे, पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले. असे सामना अग्रलेखात म्हंटल आहे.