काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसाठी मृत्यूचा सापळा रचलाय ; नितेश राणेंचा प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. पुणे आणि नागपूर हे हक्काच्या मतदारसंघात देखील भाजपला पराभव पहावा लागला आहे. हा पराभव भाजप नेत्यांच्या खूपच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच भाजपकडून आता शिवसेनेवर टीका केली जात आहे. या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा झाला आहे. शिवसेनेच्या हाती काहीच लागलेले नाही, अशी वक्तव्ये आता भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. यामध्ये आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही उडी घेतली आहे.

नितेश राणे यांनी शुक्रवारी ट्विट करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपचा पराभव मान्य केला. ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळाही फोडता आली नाही. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून नितेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीच्या बलाढ्य ताकदीपुढे भाजपचे आव्हान फिक पडत असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीची एकी भाजपला जड जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराना पराभवाचे तोंड पाहावं लागत आहे.

Leave a Comment