भाजपकडून गांधी पुतळा परिसरात गोमुत्र शिंपडून निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मनी लॉंड्रिंग प्रकरणी इडीची कारवाई झालेल्या मलिक नवाबांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने गांधी पुतळ्या समोर निदर्शने केल्याने गांधी पुतळा परिसराची विटंबना झाली असे सांगून गोमूत्र शिंपडून भाजपने पवित्र केला. माजी आमंदार दिनकर पाटील आणि माजी स्थायी सभापती, नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे शुद्धीकरण आंदोलन केले.

यावेळी बोलताना दिनकर पाटील म्हणाले बॉम्ब स्फोटात आरोपींकडून कमी दरात जमीन खरेदी करून चुकीचे काम करणाऱ्याचे समर्थन करणे निषेधार्ह आहे. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या गांधीजी च्या पुतळ्यासमोर हिंसेचे समर्थन केल्याने एक प्रकारे पुतळ्याची विटंबना झाली आहे. म्हणून भाजपच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी सुनील पाटील, अरुण यादव, सर्जेराव चव्हाण, शहाजी पाटील,राहुल पाटील, प्रताप जामदार, संदीप जाधव,प्रवीण पाटील, शरद देशमुख, विजय पवार आदी उपस्थित होते.