भाजपाकडून रस्त्यावर मानवी साखळी करत पंजाब सरकारचा निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर उतरली आहे. सांगलीत भाजपाने मानवी साखळी करत पंजाब सरकारचा जाहीर निषेघ केला. भाजपा ओबीसी सेलकडून हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करण्यात आला.

याला पंजाब सरकार जबाबदार असून पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाब सरकारचा निषेध करण्यासाठी सांगलीत भाजपा ओबीसी सेलकडून मानवी साखळी करत आंदोलन करण्यात आले. माजी आमदार दिनकर पाटील आणि नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मानवी साखळी करण्यात आली.

यावेळी पंजाब सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर पंजाब सरकारच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. तसेच पंजाब सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.