Saturday, January 28, 2023

गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का? राम कदमांचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपकडून संजय राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का? असा सवाल राम कदमांनी केला आहे.

7 वर्षांपर्यंत शिवसेना गप्प का होती असा सवाल राम कदम यांनी केला आहे. तसेच आलिशान बंगला , आलिशान गाड्या, आलिशान मंत्रालयातील केबिन हे सर्व तुम्हाला हवे होते. गुलामसारखी वागणूक तुम्हाला मिळत होती तर कोणी तुमचे तोडं शिवले होते, असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे होता असा सवाल करत राज्य सरकार विरोधातील जनतेचा रोष दुसरीकडे वळवण्यासाठी हे वक्तव्य करण्यात येत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते –

राज्यात युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.