देशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली; उमा भारतींचा घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.  नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. देशात रामराज्य आणण्याचा वचन दिलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे.

योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन उमा भारती यांनी केलं आहे.

“मी करोना वॉर्डमध्ये अत्यंत अस्वस्थ आहे. मी करोना पॉझिटिव्ह नसते तर आज त्या गावातील त्या पीडितेच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरी बसलेले असते.” असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे त्यामुळे तुम्ही माझा सल्ला ऐकावा असंही आवाहन उमा भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment