व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना एकत्र; महाविकास आघाडीत फूट

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीसाठी सेना भाजप एकत्र येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप नेते आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पक्षांतरांचा परिणाम या निवडणुकीवर होताना दिसत आहे. राणा पाटील यांच्या समर्थक गटाच्या मदतीने जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण 55 जागा असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी 28 हा बहुमताचा आकडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 26 , शिवसेना 11, काँग्रेस 13, भारतीय जनता पक्ष 4 आणि अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची शिवसेनेच्या 2 बंडखोर सदस्यांच्या पाठिंब्याने एकत्र सत्ता असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे आहे तर भाजपकडे 2 सभापती पदे आहेत.

“उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत किती सदस्य आमच्या सोबत आहेत हे मतदानानंतरच स्पष्ट होईल. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगले यांचे समर्थक आमच्या पाठीशी आहेत. या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे बंडखोर अशी महायुती होणार आहे.”

– भाजप नेते, आमदार सुजितसिंह ठाकूर

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

इराक-अमेरिका संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर; ३५० अंकांची घसरण

अमेरिकेच्या दोन हवाई तळांवर इराणने केला प्रतिहल्ला;डागली १२ क्षेपणास्त्रे

इराणमध्ये युक्रेनचं विमान दुर्घटनाग्रस्त;१८० प्रवाशांचा मृत्यू

अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने गाठणार ४५ हजाराचा टप्पा

इराणने बलाढ्य अमेरिकेविरुद्ध छेडले युद्ध !; मशिदीवर फडकावला लाल झेंडा, पहा व्हिडिओ