औरंगाबाद । ५ जून रोजी उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यनंतर सर्व मराठा समाजामध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे. सर्व मराठा नेतेही या बाबीचा विरोध करत आहेत. यावर अनेक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून. आज औरंगाबाद येथे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
औरंगाबादमध्ये काल भाजपचे खासदार संभाजी राजे यांनी दौरा केला. यावेळी ते मराठा आरक्षणा संबंधित बोले.त्यांनी मराठा बांधवांनाही भेट दिली. त्यांची अडचण जाऊन घेतली व त्यांनी त्यांची भूमिका मांडली. यावर आज हर्षवर्धन जाधव यांनी त्यांना पत्रकार परिषदेद्वारे मागणी केली कि भाजपने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात न्यावा. जसे कलम ३७० बाबद भाजपने भूमिका घेतली तशीच भूमिका मराठा आरक्षण बाबद घ्यावी.
भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, ” मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांकडून चिखलफेक होत आहे. पण दोन्ही बाजूने सकारात्मक भूमिका दिसून येत नाही. भाजपने संसदेत एक बिल आणले पाहिजे. ज्या प्रकारे कलम ३७० वर सरकाने भूमिका घेतली तशीच भूमिका मराठा आरक्षणावर घ्यावी आणि तशाच प्रकारे आरक्षणा बाबतीत निर्णय घेणायचा अधिकार केंद्राने राज्य सरकारला द्यावा.” यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधकांचे मराठा समाज बारा वाजवल्या शिवाय राहणार नाही असाही त्यांनी इशारा दिला.