नाना पटोलेंची जीभच नाही तर अक्कलही घसरली, त्यांना मानसिक उपचाराची गरज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात अस म्हंटल होत. त्यानंतर भाजप आमदार श्वेता महाले यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांची जीभच नाही तर अक्कलही घसरली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

श्वेता महाले यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, पोरकट पटोलेंची जीभच नाही तर अक्कलही घसरली.काँग्रेस मधे एकंदरीत अकलेचा दुष्काळ आहे.काँग्रेसने मोदीद्वेष केल्याने त्यांच्या पक्षाचाच जनाधार कधीच पळून गेलाय त्याकडे नानासाहेबांनी पहावे. परिस्थिती कठीण आहे पटोलेंवर चांगल्या दर्जाच्या मानसिक उपचाराची गरज आहे.खर्च वाटल्यास आम्ही करू अस त्यांनी म्हंटल.

पटोलेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज- बावनकुळे

दरम्यान, नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही समाचार घेतला. नाना पटोलेंना पंतप्रधानांबद्दल बोलताना लाज वाटत नाही. जगात क्रमांक एकचे पंतप्रधान त्यांच्याबाबत हे बोलत आहेत. हा वेडा झालेला माणूस आहे. त्याला नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी संपवल्याशिवाय ते राहणार नाही. नाना पटोले यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.