भाजपमध्ये प्रवेश करून चूक केली, पुन्हा एकदा मला पक्षात घ्या ; महिला नेत्याच ममतादिदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकीचा निकाल लागला असला तरी तेथील राजकीय वातावरण अजूनही गरम झालं आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी फोडून आपल्या पक्षात घेतले. परंतु तरिही ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता दलबदलू नेते पुन्हा एकदा स्वगृही येण्यासाठी उत्सुक झालेल दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेत्या सोनाली गुहा यांनी ममता बॅनर्जी याना पत्र लिहून परत पक्षात घेण्याची विनंती केली आहे.

“माझा भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय चुकीचा होता आणि त्याची जाणीव मला होत आहे. तिथे मला नेहमी वेगळं असल्याची जाणीव झाली. त्यांनी माझा वापर केला. मला ममतांची बदनामी करण्यास सांगितलं, पण मी असं केलं नाही. मी पुन्हा एकदा ममतांची भेट घेणार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरी जाईन, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं

भाजपात प्रवेश करून चूक केली. पक्ष सोडल्याबद्दल मी आपली माफी मागते. जर आपण मला माफ केलं नाही, तर मी जिवंत राहू शकणार नाही. कृपया मला पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी माझं उर्वरित आयुष्य आपल्या सहवासात घालवू शकेल. ज्या पद्धतीने मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे दीदी, मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही,”

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment