Thursday, October 6, 2022

Buy now

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांची अखेर दिलगिरी

मुंबई | राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला होता. ‘तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, पण शोध घ्या आणि आरक्षण द्या’ असे म्हटल्यावर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर अखेर आज चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर टीकास्त्र सुरू होते. यावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

रुपाली चाकणकरांना लिहिलेल्या पत्रात चंद्रकांत पाटील म्हणतात..

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap,सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.

माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.