अजित पवार एक तर पुण्यातून राज्य चालवा नाहीतर… : चंद्रकांत पाटलांनी पुन्हा डिवचलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेत्यांना दिला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं असून अजित पवार यांच्यावरवाढता कामाचा ताण, लोड लक्षात घेता एक तर त्यांनी राज्य पुण्यातून चालवाव किंवा त्यांनी पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा, आणि मुंबईतून चालवावा, असे म्हणत पाटील यांनी पुन्हा पवारांना डिवचलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सल्ला दिल्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी उत्तर दिल होत. त्यात पवार म्हणाले होते कि, महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या भीषण संकटाशी लढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करुन महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत. त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी हितावह ठरेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या उत्तरानंतर पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत अजित पवार यांच्या कामाविषयी मनात काहीच शंका नसल्याचे सांगितले. आणि देशातील लोकशाहीची ब्युटी अशी आहे कि कोणी काहीही बोलू शकत. त्यामुलर अजित पवारांनी बोलायला काहीच हरकत नाही. अजितदादांना याबद्दल वाईट वाटलं असेल तर माझा तो काही हेतू नव्हता, अस पाटील यांनी म्हंटल.

Leave a Comment