राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकावर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मालेगाव, अमरावतीत, नांदेड या ठिकाणी दंगली झाल्या. याची चिंता न करता बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार भाजपवर आरोप करत आहेत. “मालेगावात दुसऱ्या दिवशीच्या दंगलीत हिंदूंच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत आमचा हात होता तर पहिल्या दिवशीच्या हिंसाचारात तुमचा हात होता हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात राजकारणाचे गुन्हेगारीकर होत चालले आहे,” अशी टीका पाटील यांनी ठाकरे सरकावर केली आहे.

आज भाजपची कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकार्याना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात अनेक आतापर्यंत अनेक गुन्हे झाले त्यातील गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांना अटक झाली आहे ते ठाकरे, महाविकास आघाडी सरकामधील नेत्यांचा समावेश आहे. तसेच मालेगाव, अमरावती, नंदुरबार या ठिकाणी दंगली झाल्या. या दंगली झाल्या कशा? यामागे कोण आहे याची चिंता न करता. त्यामागे भाजपचा हात असल्याचे या सरकारमधील नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत आहेत.

भाजपवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी एक लक्षात घ्यावे की, नांदेड, मालेगावात पहिल्या दिवशी जी सुरुवात झाली ती मुस्लिमांकडून झाली त्याच्यामध्ये जर भाजपचा हात आहे. मग दुसऱ्या दिवशी जी उत्स्फुर्त प्रतिक्रिया आली. हिंदूंनी समर्थन केले तर मग पहिल्या दिवशी शिवसेनेचा हात आहे हे स्पष्ट होते, हे संजय राऊतांना माहिती असावे. मलिक व संजय राऊत या दोघांचा मार्ग एकच आहे, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.

Leave a Comment