लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असे निकाल हाती आले. यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांच्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक द्वारे पोस्ट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये पाटील यांनी म्हटले आहे की, “एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना मात्र या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनभावना लक्षात घेण्याइतके सुज्ञ नक्कीच आहेत.”

 

https://www.facebook.com/ChDadaPatil/posts/2961417834175405

“जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पाहता, जि.प. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला आहे. तर तीन पक्षांशी लढत असूनही पंचायत समितीतही भाजपाची कामगिरी दमदारच झालेली आहे. निकालाबद्दल मतदारांचे आभार, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू””

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली. झेडपी निकालात महाविकास आघाडी भाजपला वरचढ ठरली. 85 जागांपैकी 46 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. परंतु चारही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. 85 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या. काँग्रेसनेही मुसंडी मारली. याच निकालाव फेसबुक पोस्ट लिहित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे.

Leave a Comment