Saturday, March 25, 2023

शरद पवार महाराष्ट्रातील मोठे नेते, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच – चंद्रकांत पाटील 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्याबाबत टीका करण्यात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. शरद पवार यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असल्याचे म्हंटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे. मी सांगली येथील एका कार्यक्रमात अनावधानाने बोललो होतो. आमचे ते विरोधक जरी असले तर त्यांच्याबद्दल मनात अनादर नाही. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ माणसाचा अनादर करणे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवलेले नाही”

- Advertisement -

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचे आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिले नाही. सगले आयुष्य गेले पण कधी 60 वर तो गेला नाही, असे पाटील यांनी म्हंटले होते.