तुमच्यावर धाडी पडल्या तर…; चंद्रकांत पाटलांंचे पवारांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेतून आयकर विभाग व केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाण साधला होता. त्यानंआतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. शरद पवारांनी काल जे आरोप केले आहेत. त्या आरोपांना उत्तर देण्यास यंत्रणा सक्षम आहेत. मात्र, बाकीच्या ठिकाणी धाडी पडल्या तर चालतं. तुमच्यावर धाडी पडल्या तर हा सूड उगवण्याचा भाग आहे, आहे म्हणणे बरोबर नाही, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्रणांच्यावतीने ज्या काही धाडी टाकून कारवाया केल्या जात आहेत. ते त्यांचे काम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर या देशात पहिल्यांदाच धाडी पडल्या आहेत, असं जे बोललं जात आहे. इनकम टॅक्सची धाड पडणे , सीबीआयकडून वारंवार चौकशी केली जाणे अथवा ईडीच्यावतीने कारवाई करणे हे सामान्य आहे. मात्र, आपल्यावर आल्यावर बोलणे हे योग्य नाही.”

“शरद पवार तुम्हाला बाकीच्या ठिकाणी झाले तर चालते. तुमच्यावर धाडी पडल्या तर हा सूड उगवण्याचा भाग आहे. हे अधिक वेळ थांबले आहेत, हे पाहुणचार घेत आहेत. अशा प्रकारे बोलणे बरोबर नाही. पण पुन्हा एकदा त्यांनी ज्या यंत्रणांबद्दल बोलले आहे. त्यावर आम्ही बोलण्यापेक्षा त्या यंत्रणाच त्यांना उत्तर देतील.” असेही पाटील यांनी यावेळी म्हंटले आहे.

ते महाभारतातही ‘संजय’ आहेत – पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “संजय राऊत हे महाभारतातील संजय आहेत ना. त्यांना सगळं काही दिसते. धृतराष्ट्राला जे समजत होते ते राऊतांना समजतेय. राऊत हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे,” अशा शब्दात पाटील यांनी राऊतांना टोला लगावला.

Leave a Comment