राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय मी घेतला असता- उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यभर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा घाट सुरू असतानाच सत्तेतील मित्रपक्ष कॉंग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध केला आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीतच ठिणगी पडली असून विरोधी पक्ष भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले याना या मुद्द्यावरून विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

औरंगाबाद च्या नामकरण प्रकरणावर खा.उदयनराजे भोसले म्हणाले ही लोकशाही आहे इथे जनता निर्णय घेत असते. आपण पाहतो बॉम्बे च मुंबई झालं तसं लोकं निर्णय घेतील या बाबत मला काय वाटत या पेक्षा लोकांनी निर्णय घ्यावा राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता

दरम्यान, उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या बाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या स्टाईल ने या प्रश्नाचे उत्तर देत माझं मंत्रिमंडळ मीच निवडतो तसेच कुणीही मला मंत्री करू शकत नाही माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट आहे.अशी मिश्किल टिपणी त्यांनी या वेळी बोलत असताना केली.

यावेळो उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्या मुख्यमंत्री विदर्भ दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्या बाबत विचारले असता चांगलं आहे ते लोकांमध्ये फिरतायत फिरल पाहिजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे ते माझे चांगले मित्र आहेत त्यांनी फिरावं पण लोकांना फिरवू नये असा उपरोधक टोला यावेळी लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment