“पलूस-कडेगावचा पुढील आमदार भाजपचाच होणार” – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. 2019 मधील विधानसभा जर भाजपने लढवली असती तर भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. मात्र, आम्ही युती धर्म पाळत शिवसेनेला जागा दिली. सेनेने हा मतदारसंघ कॉंग्रेसला विकल्याने कॉंग्रेस कडेगावमध्ये विजयी झाली. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेतील सदस्य, पदाधिकाऱ्यांत वसंत बंगल्यावर झालेल्या हाणामारीची पक्षीय पातळीवर चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली येथे खासगी कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील आले होते. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कडेगाव-पलूस तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे. त्यामुळे कडेगाव नगरपंचायतमध्ये भाजपने घवघवीत यश मिळविले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. कडेगाव विधानसभा जर भाजपने लढवली असती तर भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. मात्र, आम्ही युती धर्म पाळला त्यामुळे ती जागा शिवसेनेला सोडली होती. परंतू शिवसेनेने हा मतदारसंघ कॉंग्रेसला विकला. सेनेला अवघी साडेचार हजार मते मिळाली. तर 50 हजार मते नोटाला गेली. त्यामुळेच कडेगावमध्ये कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. गतवेळी झालेली चूक पुन्हा होणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जाईल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment