व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड नगरपालिका निवडणुकीत भाजपा सर्व जागांवर स्वबळावर लढून सत्ता मिळवणार : विक्रम पावसकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही 29 जागांवर निवडणूक लढविणार आहे. मागील निवडणूकीत 29 पैकी 9 जागा भाजपाने लढविल्या तर 20 जागा अपक्षांशी युती करून लढविल्या होत्या.  त्यावेळी आम्ही चूक केलेली होती. मात्र या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर स्वबळावर लढणार असून सत्ता मिळवणार असल्याचे भाजपा अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले.

कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. यावेळी कराड तालुका शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, तानाजी देशमुख, अोबीसी जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, मानसिंग कदम, बापू सत्रे, धनाजी माने आदी उपस्थित होते.

विक्रम पावसकर म्हणाले, कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमीत कमी 15 जागा जिंकून सत्ता मिळवेल असा विश्वास आहे. तसेच वाॅर्ड पध्दत दुहेरी किंवा सिंगल असेल तरी जागा जिंकू. सध्या सत्ता असो किंवा नसो तरी आम्ही केलेले काम यामुळे आम्हांला विश्वास आहे. सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही निवडणुक लढविणार आहोत.