कदमांनीच मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली बॉम्ब लावला हे सिद्ध; राणेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाची माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चा होऊ लागल्या आहेत. याबाबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणेंनी निशाणा साधला आहे. शिवसेनेला अस्थिर करण्यासाठी त्यांनी एकही संधी सोडली नाही शेवटी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली रामदास कदम यांनीच बॉम्ब लावला हे सिद्ध झालं आहे, अशी टीका राणेंनी केली आहे.

भाजप नेते निलेश राणेंकडून शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली जाते. दरम्यान त्यांनी आज शिवसेना नेते रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपवरून निशाणा साधला आहे. रामदास कदमांवर त्यांनी घणाघाती टीकाही केली आहे.

राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “रामदास कदमची खरी लायकी बाहेर आली, रामदास कदम हा डुप्लिकेट शिवसैनिकचं होता, शिवसेनेला अस्थिर करण्यासाठी त्यांनी एकही संधी सोडली नाही आणि त्याच मार्गाने विरोधी पक्षनेता पद स्वतःच्या पदरात पाडून घेतलं. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली रामदास कदम यानीच बॉम्ब लावला हे सिद्ध झालं आहे.”