GHMC Election Result: हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला भगदाड

हैद्राबाद । हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांचा गड जिंकण्यासाठी भाजपनं आपला सगळा जोर लावलाय. त्यामुळे ही निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. (GHMC Election Result 2020)

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी टीआरएस १४ जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने यंदा मोठमोठे नेते प्रचारात उतरविले होते. भाजपाला २०१६ च्या निवडणुकीत ५ जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे आजची ही आघाडी भाजपाला फायद्याचीच म्हणावी लागणार आहे. हैदराबादमध्ये १ डिसेंबरला मतदान झाले होते. यावेळी 46.55 टक्केच मतदान नोंदविले गेले. सत्ताधारी टीआरएस सर्वच्या सर्व १५० जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजपा १४९ जागांवर निवडणूक लढवत आहे. एमआयएम ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे.

ओवेसींच्या गडात पाय रोवण्यासाठी पहिल्यांदाच भाजपाने महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ देखील आले होते.टीआरएसच्या नेत्या कविता यांनी सांगितले की, आम्ही १०० हून अधिक जागा जिंकणार आहोत. भाजपाचे मोठमोठे नेते निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आले होते. त्यांनी मतदारांना खोटी आश्वासने दिली. मला आनंद आहे की हैदराबादच्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही व केसीआरच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like