Wednesday, March 29, 2023

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास उपयुक्त आहे ‘हा’ तांदूळ, मधुमेही रुग्णांसाठी देखील आहे फायदेशीर 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये तांदळाला कटोरा असे देखील म्हंटले जाते. उत्तरप्रदेश मध्ये अनेक वर्षांपासून तांदळाची शेती केली जाते. इथे काळा तांदूळ म्हणून एका तांदळाच्या प्रकाराची शेती केली जाते. या शेतीमुळे शेतकरी सशक्त होताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी या तांदळाची शेती सुरु करण्यात आली आहे. सहजनवा क्षेत्रात पाच एकर आणि महराजगंजजिल्ह्यातील निचलौल क्षेत्रात जवळपास ५० एकर मध्ये शेतकऱ्यांनी ही शेती करायला सुरुवात केली आहे. मधुमेही रुग्ण हा तांदूळ खाऊ शकतात ज्यामुळे चांगला फायदा होतो आहे.

या क्षेत्रात कृषी उत्पादक संघटनेच्या मदतीने या शेतीसाठी प्रोत्साहन मिळते आहे काही शेतकऱ्यांनी पाच एकर शेतात या शेतीची सुरुवात केली आहे. या संस्थांच्या संचालकांनी या शेतीतून शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळणार असून यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट नाही तर तिप्पट होऊ शकते असे म्हंटले आहे. या परिसरात काही शेतकरी एकत्रित या तांदळाची शेती करत आहेत. हे तांदूळ मणिपूर आणि आसाम प्रदेशातील प्रमुख प्रजाती आहे. एक एकर शेतात या तांदळाचे १५-१६ क्विंटल उत्पन्न मिळते. या तांदळाची संपूर्ण शेती प्रक्रिया ही सेंद्रिय आहे. आणि १४०-१४५ दिवसात याचे पीक तयार होते. सुरक्षित अन्न म्हणून हा तांदूळ वापरला जातो.

- Advertisement -

कृषि विज्ञान केंद्राच्या एका डॉक्टरांच्या मते, या तांदळात एका विशिष्ट प्रकारचे एथेसायनिन मिळते म्हणून याचा रंग काळा असतो. यात अँटी ऑक्सीडेन्ट चे प्रमाण अधिक असते. आणि व्हिटॅमिन ई देखील असते. यासोबतच फायबर आणि प्रथिनेही मोठ्या प्रमाणात असतात.हे तांदूळ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, ऍलर्जी, गाठीच्या समस्या कमी होतात. या तांदळाची विक्री प्रति किलो ३०० रु ते ४०० रु अशी केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.