ब्लॅकमेल : गुंगीचे औषध देवून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | बिर्याणीतून गुंगीचे औषध देवून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करुन बलात्काराचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून पिडीत युवतीला ब्लॅकमेल करणार्‍या अतुल बाजीराव पाटील याला अटक करण्यात आली. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे.

पिडीत युवती इस्लामपूर येथे शिक्षण घेत होती. जुलै 2019 साली दुपारी घरीच होती. पिडीतेचे आई, वडील शेतात कामाला तर भाऊ कॉलेजला गेला होता. दुपारी 2 च्या सुमारास युवती घरी एकटीच असताना अतुल पाटील हा घरात आला. आई-वडीलांची विचारपूस केल्यानंतर त्याने युवतीला बिर्याणी खायला दिली. ते खाताच चक्कर येवुन युवती पडली. त्यानंतर ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून फोटो व व्हिडोओ शुटिंग केल्याचे अतुल पाटीलने सांगितले. फोटो व व्हिडिओ दाखवून बदनामी करण्याची धमकी देत युवतीशी वारंवार जबरदस्तीने बलात्कार करत होता. सप्टेंबर-2019 साली युवती इस्लामपुर स्टॅण्डकडे पायी चालत जाताना अतुल पाटीलने बोलावून बोलेरो गाडीत बसवले.

कासेगाव येथील काम आटोपून गावी जावूया असे म्हणत एका हॉटेल समोर गाडी थांबविली.  हॉटेलमध्ये नेवून पिडीतेवर बलात्कार केला. त्यानंतर तीन वेळा हॉटेलमध्ये जबरदस्तीने शरीरसंबंध केले. मे 2021 पर्यंत युवती घरीच एकटीच असल्याचे पाहून फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती दाखवुन वारंवार बलात्कार केला. पिडीत युवतीने अखेर या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. काही दिवसांनी अतुल मोबाईलमधील पिडीतेचे फोटो व व्हिडीओ इतरांना दाखवत होता. याबाबतची फिर्याद पिडीत युवतीने दिली आहे.

Leave a Comment