Monday, January 30, 2023

लाखोंची पाणीपट्टी थकवली! मुख्यमंत्री ठाकरेंसह इतर मंत्र्यांचे बंगले BMCकडून डिफॉल्टर घोषित

- Advertisement -

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशीच ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य काही मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर घोषित केले आहेत. तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची पाणीपट्टी थकवल्यानं महापालिकेनं ही कारवाई केली आहे.

‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळवरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाकडे पाण्याची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासोबतच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा (तोरणा), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी), जलसंपदामंत्री जयंत पाटील (सेवासदन), ऊर्जामंत्री नितीन राऊत (पर्णकुटी), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे-पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (चित्रकूट), राजेंद्र शिंगणे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागिरी), छगन भुजबळ (रामटेक), विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (अजिंठा) आणि सह्याद्री अतिथीगृहाचा समावेश आहे.
पाणी बिल थकबाकी

- Advertisement -

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामन्य जनतेने का भरावे ? तसेच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या शासकीय आवासाचे पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी विचारला आहे.

 

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’