कंगनाचा पंगा, BMCने दाखवला इंगा! कार्यालय केलं सील, येत्या २४ तासांत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

मुंबई । कंगनाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चहुबाजूंनी टीका होत असताना आता कंगनाला मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना राणावतला चांगलाच दणका दिलाय. कंगनाच्या (kangana ranaut ) कार्यालयाची काल पाहणी केल्यानंतर आज महापालिकेने (bmc) तिचं कार्यालय सील केलं आहे. तसेच तसेच येत्या २४ तासांत कार्यालयातील बांधकामासंदर्भात घेण्यात आलेल्या परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही तिला देण्यात आले आहेत.

एच पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त, विनायक विसपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार,’आम्ही कंगनाला २४ तासांचा वेळ दिला आहे. २४ तासात तिने तिच्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाबाबत संयुक्तिक स्पष्टीकरण दिले नाही तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत. बीएमसीला फक्त स्पष्टीकरण नकोय, ते संयुक्तिकही असायला हवं. या बांधकामाबद्दल तिचं म्हणणे ती मांडेल. आम्ही पूर्णपणे पाहणी करून हे अनधिकृत बांधकाम नोटीसमध्ये सांगितलं आहे.

पालिका अधिनियम ३५४(ए) अंतर्गत कंगना तिच्या घरातून ऑफिसचं कोणतंच काम करू शकत नाही. कंगनाने अनधिकृतपणे तिचं ऑफिस बांधल्याचं पालिकेच्या पाहणीत आढळून आलं आहे. कंगनाने ऑफिसात स्वतंत्रपणे पार्टिशन केलं आहे. बाल्कनी एरियाचा रुम म्हणून वापर केला असून हे अंतर्गत बदल ऑफिस नियमांचं उल्लंघन असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. तसेच तळमजल्यावरील टॉयलेटचं ऑफिस केबिनमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. तळमजल्यावरच अनधिकृतपणे किचनचं स्टोअर रुममध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. त्याच मजल्यावर अनधिकृतपणे पँट्रीही तयार करण्यात आल्याचं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.

शिवाय पहिल्या मजल्यावरील रुममध्ये अनधिकृतपणे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावरील पूजा घरात बेकायदेशीर पार्टीशन बनविण्यात आलं आहे. शिवाय तिथे अनधिकृतपणे टॉयलेट बांधण्यात आलं आहे. दुसऱ्या मजल्यावर बंगला नंबर ४ आणि बंगला नंबर ५ मधील भिंत पाडण्यात आली असून हे दोन्ही बंगले एकमेकांना जोडण्यात आले आहेत. तसेच मुख्य दरवाजाची पोझिशनही बदलण्यात आल्याचं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like