BMC Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, महिना मिळणार तब्बल 81 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BMC Recruitment 2024 | दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. आता राज्य सरकारच्या विविध विभागा अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. आणि त्यासाठी नोटिफिकेशन देखील जारी करण्यात.

त्याचबरोबर रेल्वे आणि बँकेमध्ये परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्यासाठी देखील ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आणि फायद्याचा असणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर यामध्ये पदवीधर असलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 38 जागांसाठी भरती प्रक्रिया चालणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत म्हणजेच बीएमसी अंतर्गत नोकरीची मोठी संधी आहे. यासाठी विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने मानव संसाधन समन्वयक अर्थात ह्युमन रिसोर्सेस कोऑर्डिनेटर या पदासाठी करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

रिक्त पदांची भरती

महानगरपालिके अंतर्गत राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया 38 जागांसाठी असणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा | BMC Recruitment 2024

बीएमसी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ओपन कॅटेगिरीतील उमेदवारांना 1000 रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी भरावी लागणार आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर परीक्षा प्रथम प्रयत्नात 45 टक्क्यांनी पास असणे गरजेचे आहे

मासिक पगार किती मिळेल

उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना दर महिन्याला 25500 ते 81,000 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची प्रक्रिया ही 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2024 असणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.